MarathiGyaan - Essay, Speech, Stories and More

झाडाची आत्मकथा निबंध मराठी | Tree Autobiography In Marathi | MarathiGyaan

Autobiography of a tree in marathi | मी झाड बोलतोय मराठी निबंध.

या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे एका झाडाची आत्मकथा मराठी निबंध   (Tree Autobiography In Marathi) . या निबंध मध्ये एका झाडाचे मनोगत सांगितले आहे झाडाला कोण कोणत्या दिक्कत झेलावा लागतात आणि का झाड हे मानवानं साठी महत्वपूर्ण आहे हे या निबंध मध्ये सांगितलं आहे. 

Tree Autobiography In Marathi

आशा करतो झाडाचे मनोगत निबंध तुम्हाला नक्की आवडेल. 

मी झाड बोलतोय मराठी निबंध

माझ्या गावात एक मोठा कारखाना उभारण्यासाठी जंगलतोड सुरू होती. एकामागून एक झाडे तोडत सुटलेले काही लोक अखेर एका वटवृक्षाजबळ आले आणि ... आणि काय नवल! त्या वृक्षाने गर्जजा केली-''दूर व्हा कृतध्न करंट्यांनो, निर्दयी माणसांनो !'' क्षणात वृक्षतोड करणारे थबकले. सर्वांनी आश्चर्याने कान टवकारले. पुन्हा तो घनगंभीर आवाज कानी आला-

“अरे मूर्खांनो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. आजपर्यंत शेकडो पावसाळे मी पाहिले. भूमातेकडून होणारे लालनपालन आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगांतून सतत बहरत राहिलो आणि आता या माझ्या उतारवयातही मी काटक आहे, मजबूत आहे. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही. 

“मित्रांनो, मी केवळ एक जुना वठलेला वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे, हितकर्ता आहे. या गावाचा जन्म र्‍या गावाचा विकास, या गावाचे आजचे समृदूध स्वरूप या साऱ्यांचा मी एक मूक साक्षीदार आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबे येथे राहायला आली. पण तेव्हादेखील त्यांनी प्रथम माज्ञ पूजन करून नंतरच गावात प्रवेश केला. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत. ही प्रथा पिढ्यान्‌पिढ्या चालू राहिली.

“मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहुण्यांना, श्रान्त पांथस्थांना माझ्या शीतल सावलीत आसरा दिला. अनेक पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांद्यांवर खेळत असतात आणि रात्री माझ्याच फांद्यांवर 'विसावतात. गावातील सारी मुले सूरपारंब्या खेळण्यासाठी येथेच जमतात. कित्येक सुवासिनी दरवर्षी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात. अशा रितीने माझा हा सारा आसमंत म्हणजे गावाचे एक तीर्थक्षेत्र बनला आहे.

“या गावकऱ्यांविषयी मला विलक्षण जिव्हाळा वाटतो. म्हणून उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या माझ्या फांद्यांनी मी वरुणराजाला सदैव कळकळीचे आवाहन करीत असतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे सावट कधीच भेडसावत नाही. लोकहो, तुम्ही गावाला नवे रूप देताना येथील जुन्या वृक्षांची कत्तल करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा. '' इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि काय चमत्कार ! वृक्षतोडीसाठी जमलेले सारे लोक दूर झाले, ते अधिक झाडे लावण्याच्या निर्धारानेच !

हा झाडाची आत्मकथा निबंध मराठी (Tree Autobiography In Marathi) निबंध तुम्हाला कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून नक्की कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share जरूर करा.

वाचाल तर वाचाल मराठी निबंध

माझी आई निबंध मराठी मधे  

झाडाचे महत्त्व मराठी निबंध

माझे बालपण निबंध

प्रदूषण वर मराठी निबंध

You might like

autobiography essay in marathi

मस्त आहे मला खूप आवडला

Post a Comment

Contact form.

शाळेचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of School Essay in Marathi

Autobiography of School Essay in Marathi: मी एक प्रशाला आहे. कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्हयातील या आडवळणी ‘बाणेर’ गावातील. पण आज माझ्या एका विदयार्थ्यामुळे गावाला जत्रेचे स्वरूप आले आहे. आज अनेक मोठी माणसे या गावात आली आहेत. मला सजवण्यात आले आहे. माझ्यावर रोषणाई करण्यात आली आहे. एवढा थाटमाट कशासाठी? अहो, माझ्या ‘विश्वास’ नावाच्या एका सुपुत्राने मला सर्व महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. यंदाच्या शालान्त परीक्षेत सर्व विभागांतून माझा ‘विश्वास तायडे’ प्रथम आला आहे.

काल दुपारी ही बातमी गावात पसरली तेव्हापासूनच गावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज सकाळी अधिकृत रीतीने परीक्षेचा निकाल घेऊन महाराष्ट्र शालान्त परीक्षा मंडळाचे अधिकारी गावात आले. तेव्हा विश्वास आपल्या वडिलांच्या दुकानात काम करत होता. गुणी मुलगा. आपला विश्वास हुशार आहे, याची त्याच्या आईवडिलांना, त्याच्या गुरुजींना कल्पना होती; तरीपण विश्वास एवढे प्रचंड यश मिळवेल अशी कुणाला कल्पनाही नव्हती ! अशा या विश्वासमुळे मी आज दूरदर्शनवर झळकले.

लोकहो, तुम्ही आज माझी छोटी कुडी दूरचित्रवाणीवर पाहिलीत ना ! छोटी मूर्ती, मोठी कीर्ती ! असेच गुणी विदयार्थी मला नेहमी भेटत गेले. याचे सारे श्रेय जाते माझ्या जन्मदात्याकडे, शामराव रेगे यांच्याकडे. गाव त्यांना ‘भाऊ’ म्हणून ओळखते. शहरात प्रकृती ठीक राहत नव्हती. म्हणून ते गावाकडे आले. पण त्यांना स्वस्थ कसले बसवते! गावात शाळा नाही हे पाहून ते अस्वस्थ झाले. गावातील मुले तीनचार किलोमीटर चालत दुसऱ्या गावी जात. भाऊ त्यांना अभ्यासात मदत करत. त्याचबरोबर त्यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू केला आणि पुढच्या जूनमध्ये माझा जन्म झाला.

सुरुवातीला भाऊंच्या घरातील दोन खोल्यांचा माझ्यासाठी उपयोग केला जात असे. भाऊंना गावातील आप्पांची मदत मिळाली. भाऊंच्या पत्नी ताईपण शिकवण्याच्या कामी मदत करत. अगदी पहिलीपासून चवथीपर्यंतचा अभ्यास येथे चाले. भाऊंच्या तालमीत मुले तयार होत होती. दोनचार वर्षांत भाऊंनी सरकार दरबारी प्रयत्न करून प्रशालेची अनुमती मिळवली. मग जागेची आवश्यकता निर्माण झाली. भाऊंनी आपले पैसे घातले. गावकऱ्यांनी मदत केली, ग्रामपंचायतीनेही आपली जबाबदारी उचलली आणि आजची ही टुमदार इमारत उभी राहिली. पाहता पाहता मला प्रशालेचे स्वरूप आले. नवीन शिक्षक नेमले; पण शिक्षक नेमताना एक पक्के धोरण आखण्यात आले होते. ते म्हणजे – शिक्षक नेमायचे ते या किंवा आसपासच्या गावातलेच नेमायचे. भाऊंनी आपल्याकडची निष्ठा त्या शिक्षकांमध्ये ओतली. सर्वांनी अपार कष्ट घेतले. त्यामुळे विदयार्थ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आणि आजचे यश पाहायला मिळाले.

“माझे नामकरण करायची वेळ आली तेव्हा सर्वांना वाटत होते भाऊंचे नाव दयावे; पण भाऊंनी विरोध केला. मग सर्वानुमते ‘विदया निकेतन’ हे नाव मला मिळाले. आता लवकरच माझा रौप्यमहोत्सव साजरा होणार आहे. माझ्याकडे शिकलेले अनेक विदयार्थी शहरात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. ते माझ्यासाठी मोठी इमारत बांधणार आहेत, असे कानावा आले आहे. बघू या ! भाऊ आता थकले आहेत. आजचे यश पाहून ते तृप्त झाले आहेत. आज मला गावाचे वैभव मानले जाते.”

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • I am talking mirror autobiography Essay | Mi Arsa Boltoy Nibandh | मी आरसा बोलतोय आत्मकथन…
  • Autobiography of a Soldier Essay | Sainikachi atmakatha Nibandh | एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध
  • Autobiography of a bicycle Essay | Cycle chi atmakatha Nibandh | सायकलचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • Autobiography of a river Essay | Nadi ki atmakatha Nibandh | नदीची आत्मकथा मराठी निबंध
  • Tree autobiography Essay | Tree autobiography Nibandh | मी झाड बोलतोय मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, Autobiography of Book in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, autobiography of book in Marathi हा लेख. या पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध लेखात या विषयाची संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल.

सर्व वर्गांतील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना एकाच लेखात संपूर्ण माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे, जेणेकरून तुमचा सर्व वेळ वाया जाणार नाही. चला तर मग पाहूया पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, autobiography of book in Marathi हा लेख.

या लेखातील महत्वाचे मुद्दे

कोणीतरी म्हटले आहे की शरीरासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच पुस्तके देखील आहेत. लहान मुलांना पौष्टिक आहार दिला जातो जेणेकरून ते कोणत्याही आजारापासून दूर राहतील. लहान मुले हळूहळू बदलतात आणि जसजसे ते मोठे होतात, पुस्तके त्यांना नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतात.

बाल्यावस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत, त्याच्या पालकांनी त्याला वाढताना पाहिले. त्यामुळे मानवी शरीरात बदल होतात. परिवर्तनाची आणि ज्ञानाची, मानवी मनात रुची निर्माण करणारी पुस्तके, मानवी शरीरात चैतन्य निर्माण करणारी पुस्तके या पुस्तकांचे वाचन करून अनेक ठिकाणी पुस्तके आपल्याला मदत करतात.

एखादी व्यक्ती वयाच्या चौथ्या वर्षापासून लहान असतानाच लिहायला आणि वाचायला शिकायला लागते. अशा वेळी त्याच्या हातात पुस्तक देऊन त्याला चांगल्या ठिकाणी घेऊन जाते. हळूहळू त्याला पुस्तकातील रंगीबेरंगी गोष्टी कळायला लागतात आणि त्यामुळे मुलाला वाचनाची आवड निर्माण होते.

पुस्तकाचे मनोगत

होय मी पुष्ट्क बोलतोय, मी तुमच्या सर्वांचा खरा सोबती आहे, तरुण आणि वृद्ध, स्त्री आणि पुरुष. मी प्रत्येकासाठी काम करतो. मुलांना माझी रंगीत चित्रे पाहायला आवडतात. मी त्यांचे मनोरंजन करतो आणि त्यांना शिक्षण देतो. जीवनात खरे यश वाचनात येते, त्यामुळे जीवनातील यशाची गुरुकिल्ली मी आहे.

माझ्याकडे असंख्य रूपे आहेत आणि माझ्या सर्व प्रती कोणीही वाचू शकत नाही. जर हिंदूंसाठी मी रामायण, गीता किंवा महाभारत आहे, तर मुस्लिमांसाठी मी कुराण आहे. जर ख्रिश्चन लोक मला बायबल मानतात, तर शीख लोक मला गुरू ग्रंथ साहिब म्हणून वाचतात आणि माझ्या शिकवणीचे पालन करतात. या वेगवेगळ्या आकारांमुळे माझी अनेक नावे आहेत. माझे वेगवेगळे आकार वाचनालयात बघायला मिळतात.

मानवी समाजात ज्याप्रमाणे अनेक जाती आहेत, त्याचप्रमाणे माझ्याही अनेक जाती आहेत. कथा, नाटक, कादंबरी, कविता, समीक्षा, लेख इत्यादी अनेक प्रकार आहेत आणि मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान शिक्षण इत्यादी अनेक प्रकार आहेत. तो आता कोणती आवृत्ती पसंत करतो हे वाचकांच्या पसंतीवर अवलंबून आहे.

माझा जन्म कसा झाला

माझी वाढ आणि विकास लहानपणापासूनच खूपच हळू गतीने होत आहे. तुम्ही आज माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्राचीन काळी माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे. प्राचीन काळी कागद किंवा छपाईचा शोध लागला नव्हता. त्यावेळी शिक्षणाचे हे स्वरूप नव्हते. त्या काळात विद्यार्थ्याला मौखिक ज्ञान दिले जात असे आणि विद्यार्थी देखील आपल्या गुरूंचे शब्द लक्षात ठेवेल आणि आपल्या जीवनात लागू करेल.

कागदाचा शोध

कागद बांबू, पेंढा, लाकूड इत्यादीपासून बनवला जातो. पाने छापण्यासाठी प्रिंटिंग मशीनचाही वापर केला जात आहे. छापून आल्यावर मी ते पुस्तकाच्या रूपात संकलित करतो आणि मग पुस्तकाच्या रूपात तुमच्यासमोर येतो.

निसर्गाप्रमाणेच मी मानवजातीच्या हितासाठी जगतो. माझे वाचन ज्ञान वाढवते, नवीन माहिती देते आणि वाचकाचे मनोरंजन करते. जर मी निराश व्यक्तीमध्ये आशा निर्माण केली तर मी आशावादी व्यक्तीमध्ये नवीन ऊर्जा आणतो. मी खचलेल्या माणसाला आधार देतो, तर असहाय्य माणसाला मदत करतो. जो भरकटतो त्याला मी मार्ग दाखवतो आणि जो चांगुलपणाच्या मार्गाने चालतो त्याला मी मार्ग दाखवतो. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही माझी सेवा घेऊ शकता, मी खात्री देतो की मी तुमचा थकवा दोन मिनिटांत दूर करू शकेन.

मला वाचून तुम्ही तुमचा वेळ हुशारीने वापरू शकता कारण मी ज्ञानाचा खजिना आहे. जगातील सर्व महापुरुष, शास्त्रज्ञ, ज्योतिषी यांनी मला वाचून ही उंची गाठली आहे. मला वाचल्याशिवाय ज्ञानाच्या शिखरावर पोहोचलेला जगात कोणीही नाही.

पुस्तकाचा प्रवास अनेक ठिकाणी ज्ञानाचा स्त्रोत ठरला, पण या सर्व घडामोडींचा स्वतः पुस्तक मूक प्रेक्षक आहे आणि तो त्याला आपला चांगला मित्र मानेल अशी आशा आहे.

माणसाला त्याच्या आयुष्यात एकाकीपणाचा सामना करावा लागतो पण असे म्हणतात की पुस्तकात नकारात्मक भावना काढून टाकण्याची ताकद असते ज्याला काही लोक सर्वोत्तम सहयोगी मानतात.

आज आपण काय वाचले

तर मित्रांनो वरील लेखात आपण पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, autobiography of book in Marathi हि माहिती पाहिली. मला खात्री आहे कि मी तुम्हाला पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा  मराठी निबंध या विषयावरील सर्व माहिती वरील लेखात मिळाली असेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध लेखात काही चूक असेल तर आम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकू किंवा वरील लेखात तुमची अधिक माहिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू.

जाता जाता मित्रांनो, जर तुम्हाला या लेखातून पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, autobiography of book in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

मी वाघ बोलतोय / वाघाची आत्मकथा निबंध | autobiography of tiger in Marathi

वाघाचे मनोगत मराठी निबंध | Waghachi Atmakatha Marathi Nibandh  

autobiography of tiger in Marathi: मित्रांनो वाघ हा भारताचा राष्ट्रीय पशू आहे. वाघ खूप शक्तिशाली असतो. वेळप्रसंगी सिंहालाही हरवणाऱ्या वाघाला जंगलातील सर्वच प्राणी घाबरतात. 

आज आपण अशाच एक वाघाची आत्मकथा/आत्मवृत्त / वाघाचे मनोगत  पाहणार आहोत. हा वाघ त्याचे मनोगत सर्वांसमोर मांडत आहे. तर चला सुरू करूया.  

वाघाची आत्मकथा मराठी निबंध | autobiography of tiger in Marathi

मी काय आहे? लोक म्हणतात मी एक पशु आहे. जंगलातील सर्वाधिक शक्तिशाली पशुंपैकी एक... माझे नाव वाघ आहे आणि मी तुमच्या घरात ये-जा करणाऱ्या मांजरीच्या कुटुंबातील आहे. परंतु मी तुमच्या घरात न राहता, मानवी वस्तीपासून दूर अश्या घनदाट जंगलात राहतो. तुमच्यासारखे मनुष्य विचार करतात की मी खूप ताकतवर आहे. परंतु मला असे अजिबात वाटत नाही. मला तर वाटते की माझ्या सारखा दुर्बल प्राणी कोणीही नाही. मी असे का म्हणत आहे हे जाणून घायचे आहे का? हो, तर ऐका मग..

माझा जन्म सुंदरबनच्या घनदाट अंधार असलेल्या एका सुंदर अरण्यात 'बंगाल टायगर' प्रजातीत झाला होता. माझ्या आई माझे नाव शेरू ठेवले. माझे लहानपण खूप आनंदात जात होते. हळू हळू मी मोठा होऊ लागलो. दिवसेंदिवस माझ्या शरीराची वाढ होत होती. माझे मजबूत हात-पाय आणि शक्तिशाली शरीराचे रूप कोणालाही मोहित करीत असे. लहानपणी एकदा मी माझी आई व मोठ्या भावासोबत शिकारीला निघालो. 

त्या दिवशी आई मला व माझ्या भावाला शिकारीचे धडे देत होती. आम्ही एका नदीच्या किनारी झाडांमध्ये जाऊन बसलो. कोणताही आवाज न करता शिकार करण्यासाठी आम्ही सज्ज झालो. थोड्या वेळात हरणीचा एक कळप नदीवर आला. त्या सर्व हरणी पाणी पिण्यात मग्न झाल्या. माझ्या आईने आम्हाला शिकार कशी करावी हे लक्ष देऊन पाहण्यास सांगितले. व ती एक एक पाऊल टाकत पुढे सरकू लागली. हरणीच्या थोड्या जवळ पोहचताच एक जोरदार झेप घेऊन तिने एका हरणीला पकडले. आपले धारदार दात तिच्या पोटात टाकले. वाघिणीचे आक्रमण झाल्याने इतर हरनी सुसाट वेगाने पळत सुटल्या. त्या दिवशी आम्हाला खूप छान मेजवानी मिळाली होती. 

आम्ही मिटक्या मारीत हरणीचे मास खाण्यात गुंग झालो. इतक्यात जोरदार गोळीचा आवाज झाला. आवाजाने मी एकदम घाबरलो. आणि वेगाने आईच्या मागे पडू लागलो. दुर्देवाने ती गोळी माझ्या भावाच्या छातीत लागली. गोळी लागताच क्षणी तो खाली कोसळला. आई आणि मी आपले प्राण वाचवत एका गुहेच्या आत शिरलो. तेथून आम्ही पाहिले दोन शिकारी माझ्या भावाच्या मृत शरीरा जवळ आले. त्यांनी त्याला दोराने बांधून आपल्या ट्रॅक मध्ये ओढले व त्याच्या मृत शरीराला घेऊन शहराकडे निघाले. त्या दिवशी मनुष्याचे हे जग किती कठोर आहे हे मी पहिल्यांदाच अनुभवले. 

दिवसामागून दिवस जाऊ लागले. मी आणखी मोठा आणि शक्तिशाली झालो. आता मी माझ्या आईच्या मदतीशिवाय स्वबळावर शिकार करू लागलो. असाच एक दिवस उगवला. मी शिकारीला निघालो. परंतु आज काही केल्या शिकार मिळत नव्हती. खूप प्रयत्न करूनही एक ससा देखील हाती लागला नाही. शेवटी थकून मी घराकडे परत निघालो. इतक्यात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांमधून काहीतरी आवाज येऊ लागला. मला शिकाऱ्याच्या वास आला. मी जीव वाचवण्यासाठी जोरात पळालो. मागून कोणीतरी माझे पाय खेचत आहे असे वाटू लागले. आणि एवढ्यातच डोळ्यांपुढे अंधार झाले. माझ्या सोबत काय झाले काहीच माहीत नव्हते. 

जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका पिंजऱ्यात होतो. माझ्या आजूबाजूच्या पिंजर्यांमध्ये माकड, हत्ती असे वेगवेगळे जंगली पशु कैद करून ठेवले होते. हळू हळू सर्वकाही माझ्या लक्षात येऊ लागले. मी एका सर्कशीत होतो आणि त्या दिवशी मी व माझ्यासारख्या इतर जंगली पशूंना पकडून सर्कशीमध्ये आणण्यात आले होते. नंतर मला काही इंजेक्शन टोचण्यात आली. आणि पिंजऱ्यातून बाहेर काढून सर्कशीत केल्या जाणाऱ्या कसरतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

दिवसामागून दिवस जाऊ लागले. जंगलासारखे येथे शिकार करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. सर्कस चे मालक मला दररोज प्राण्यांचे मास खाऊ घालत असत. मी दररोज सर्कशीच्या कार्यक्रमात माझे कर्तब दाखवायचो. लोकांच्या वाजणाऱ्या टाळ्या आणि त्यांच्या द्वारे माझी तोंडभरून प्रशंसा मला खूप आवडायची. 

सर्कशीत माझे अनेक मित्र बनले. याच मित्रांपैकी एक होता बबलू. बबलू एक गोरीला होता. शरीराने खूप ताकदवान दररोज दहा डझन केळे एकटाच खाणारा. परंतु काही दिवसांपासून मी निरीक्षण केले की बबलू आधी सारखा आनंदी नव्हता. बहुतेक त्याची तब्येत खराब झाली असावी. आजारी असल्याने एके दिवशी सर्कशीत त्याने व्यवस्थित कर्तब केले नाही. या वेळी लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. रिंगमास्टर ला खूप संताप आला. त्याने बबलू ला एका बंद खोलीत नेऊन सोडून दिले. जवळपास दोन दिवसांनी मला त्या खोलीचे दार उघडे दिसले. दोन दिवसांपासून आम्हा दोघांची भेट झाली नव्हती. आजूबाजूला कोणीही नाही अशी खात्री करून मी त्या खोलीत शिरलो. आतून खूप घाणेरडा वास येत होता. तेथे मला बबलू पडलेला दिसला. मी धावत त्याच्या जवळ गेलो. "बबलू, बबलू!" मी त्याला आवाज दिला. पण मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मला लक्षात आले की आता तो आमच्यात राहिला नव्हता. 

बबलू च्या मृत्युने मी खूप उदास झालो. मला मनुष्याच्या लालची स्वभावाची ओळख झाली होती. बबलू आजारी असल्याने तो सर्कशीतील कर्तब करीत नव्हता. म्हणून रागाच्या भारत सर्कस मालकाने त्याला कोंडून दिले. दोन दिवस काहीही खाऊ घातले नाही. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मी विचार करू लागलो की जर मी सुद्धा बबलू प्रमाणे आजारी झालो. तर माझ्यावरही अशीच पाळी येईल. पण मी आता काहीही करू शकत नव्हतो. शिवाय माझ्या तंबूत येऊन निपचित पडून राहण्याऐवजी...

--समाप्त-- 

तर मित्रहो हा होता  waghachi atmakatha किंवा  waghache manogat या विषयांवरील मराठी निबंध. आशा करतो की हा निबंध तुम्हाला आवडला असेल. ह्या निबंधाला इतरांसोबत शेअर करून आम्हास सहाय्य करा. धन्यवाद.. 

  • भारतीय वाघ: संपूर्ण माहिती
  • पूरग्रस्ताची आत्मकथा मराठी निबंध
  • माझा आवडता प्राणी सिंह

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

COMMENTS

  1. पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A book Essay In Marathi

    Autobiography Of A book Essay In Marathi पुस्तके हे आपले गुरु असतात त्यामुळे शिक्षण आणि नंतर जर सर्वात जास्त पाण्याचा आपल्या साठी कोणता स्तोत्र असेल तर तो म्हणजे पुस्तक पण ...

  2. एका शेतकऱ्याचे आत्मचरित्र वर मराठी निबंध Essay On Autobiography Of A

    एका शेतकऱ्याचे आत्मचरित्र वर मराठी निबंध Essay on Autobiography of a Farmer in Marathi (200 शब्दात) मी एक शेतकरी आहे, मातीची मशागत करतो आणि जीवनाची बीजे लावतो.

  3. मी झाड बोलतोय, झाडाची आत्मकथा मराठी निबंध, Tree Autobiography Essay in

    Tree Autobiography Essay in Marathi - मी झाड बोलतोय, झाडाची आत्मकथा मराठी निबंध. झाडाची आत्मकथा या विषयावर लिहलेला हा मराठी निबंध सर्वांसाठी उपयोगी आहे.

  4. नदीचे आत्मवृत्त वर मराठी निबंध Essay On Autobiography Of A River In Marathi

    नदीचे आत्मवृत्त वर मराठी निबंध Essay on Autobiography of a river in Marathi (100 शब्दात) मी कालांतराने वाहणारी नदी आहे, माझे आत्मचरित्र मी तयार केलेल्या ...

  5. पेनाची आत्मकथा मराठी निबंध, Autobiography of a Pen Essay in Marathi

    पेनाची आत्मकथा मराठी निबंध, autobiography of a pen essay in Marathi. पेनाचे मनोगत या ...

  6. पक्ष्याचे आत्मवृत वर मराठी निबंध Essay On Autobiography Of Bird In Marathi

    पक्ष्याचे आत्मवृत वर मराठी निबंध Essay on Autobiography Of Bird in Marathi (400 शब्दात) एके काळी, मी एक लहानसा पक्षी होतो ज्याची पिसे होती आणि जिज्ञासू हृदय होते.

  7. वठलेल्या वृक्षाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध Essay On Autobiography Of A

    वठलेल्या वृक्षाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध Essay on Autobiography of a grown tree in Marathi (400 शब्दात) मी जंगलाच्या शांततेत उंच आणि सुबकपणे उभा आहे, काळाचा ...

  8. शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त मराठी निबंध Essay On Autobiography Of

    March 4, 2024 by Srushti Tapase. Essay On Autobiography Of School Bag In Marathi शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त, मी शाळेचे दप्तर बोलू लागलो, स्कूल बॅगचे मनोगत या विषयावर हा निबंध मला ...

  9. पोपटाचे आत्मवृत वर मराठी निबंध Essay On Autobiography Of A parrot In

    पोपटाचे आत्मवृत वर मराठी निबंध Essay on Autobiography of a parrot in Marathi (400 शब्दात) भारतीय जंगलाच्या मध्यभागी एक रंगीबेरंगी आणि पंख असलेले जीवन सुरू झाले.

  10. संगणकाचे आत्मवृत वर मराठी निबंध Essay On Autobiography Of A Computer In

    संगणकाचे आत्मवृत वर मराठी निबंध Essay on Autobiography of A Computer in Marathi (100 शब्दात) मी एक संगणक आहे, एका कारखान्यात जन्माला आले आहे जिथे मानवांनी माझे घटक ...

  11. शाळेचे आत्मवृत्त वर मराठी निबंध Autobiography Of A School Essay In Marathi

    Autobiography Of A School Essay In Marathi मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शाळेचे आत्मवृत्त ...

  12. मी झाड बोलतोय [झाडाची आत्मकथा] मराठी निबंध

    झाडाची आत्मकथा. मी वृक्ष बोलतोय. Tree autobiography in marathi. तर मित्रांनो ही होती zadachi atmakatha in marathi/ mi vruksha boltoy marathi nibandh व झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी तुम्हाला ...

  13. संगणकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Essay On Autobiography Of A Computer In

    Essay On Autobiography Of A Computer In Marathi मित्रांनो आज मी इथे संगणकाचे आत्मवृत्त , मी संगणक बोलतोय, संगणक बोलू लागला तर या विषयावर हा निबंध लिहित

  14. पक्षीचे आत्मवृत्त निबंध मराठी Autobiography Of A Bird Essay In Marathi

    Autobiography Of A Bird Essay In Marathi पक्षीचे आत्मवृत्त निबंध मराठी हा निबंध तुम्हाला अवश्य आवडेलच. आज मी पक्षीचे आत्मवृत्त लिहित आहोत.

  15. मोबाईलची आत्मकथा मराठी निबंध Autobiography Of Mobile Essay In Marathi

    Autobiography Of Mobile Essay In Marathi मित्रांनो आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक आमूलाग्र बदल आणि शोध लागले आहेत. या सर्व शोधांपैकी एक शोध म्हणजे मोबाईलचा शोध

  16. एका झाडाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध Essay On Autobiography Of A Tree In

    Essay On Autobiography Of A Tree In Marathi मला भेटा, शांत जंगलाच्या मध्यभागी उंच उभे असलेले एक झाड. एका झाडाचे आत्मवृत्त शेअर करून मी तुम्हाला माझ्या

  17. झाडाची आत्मकथा निबंध मराठी

    Autobiography of a Tree in Marathi | मी झाड बोलतोय मराठी निबंध. या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे एका झाडाची आत्मकथा मराठी निबंध (Tree Autobiography In Marathi). या ...

  18. शाळेचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography of School Essay in Marathi

    Autobiography of School Essay in Marathi: मी एक प्रशाला आहे. कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्हयातील या आडवळणी 'बाणेर' गावातील.

  19. पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, Autobiography of Book in Marathi

    पुस्तकाचे मनोगत, पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध, Autobiography of Book in Marathi. कोणीतरी म्हटले आहे की शरीरासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच पुस्तके ...

  20. नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A River Essay In Marathi

    नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध Autobiography Of A River Essay In Marathi { ४०० शब्दांत } सर्वाना नमस्कार, आपण मला ओळखलात का? मी एक नदी आहे. माझे नाव सिंधु नदी असे आहे.

  21. पक्षाचे आत्मवृत मराठी निबंध Autobiography Of A Bird Essay In Marathi

    March 5, 2024 by Wiki Mitra. Autobiography Of A Bird Essay In Marathi नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत पक्षाचे आत्मवृत वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही ...

  22. मी वाघ बोलतोय / वाघाची आत्मकथा निबंध

    0. वाघाचे मनोगत मराठी निबंध | Waghachi Atmakatha Marathi Nibandh. autobiography of tiger in Marathi: मित्रांनो वाघ हा भारताचा राष्ट्रीय पशू आहे. वाघ खूप शक्तिशाली असतो ...

  23. Stitches that Endure: With 'Reparaciones,' New Visions of Healing

    Many Spanish-speaking tailor or garment workers refer to completing their tasks as hacer reparaciones — to make repairs. The phrase echoes reparations — the correcting of wrongs against underrepresented people. Sharim found the Huntington Park tailor shop he photographed to be "deeply poetic." In the poem "paradise is far from the freeway ...